लहानपणापासूनच व्यवस्थापनाबद्दल म्हणजेच Management बद्दल मला खूप उत्सुकता
होती. साधारणतः १३-१४
वर्षांपूर्वी माझे वडील एका बँकेत काम करत होते. त्या वेळी, जेव्हा मी त्यांच्याबरोबर त्याच्या बँकेमध्ये
जात असे. असेच एके दिवशी मी त्यांचाबरोबर बँकेमधे गेलो. तिथे गेलो असता मला AC केबिनमध्ये एक सज्जन गृहस्त बसलेला दिसला. जेव्हा मी विचारले तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले की केबिनमध्ये बसलेला माणूस हा त्या बँकेचा मैनेजर आहे . थोडक्यात काय तर ,तो बॉस होता आणि बँकेचे व्यवस्थापन म्हणजेच Management करण त्याच काम होत.
जुन्या बॉलीवुड
मूवीज मध्ये मी पहिलेला मैनेजर म्हणजे सूट बूट घालून , मस्तपैकी एक कार चालवत , सुंदर अणि cute मुलींचा घोळक्यात drinks घेत असलेला माणूस म्हणजे मैनेजर (बर हे Imagine करताना मला मुळीच कल्पना नव्हती की १६ वर्षांनी मी पण Manager होणार आहे ). मी ठरविले की एके
दिवशी मी पण Manager होईन आणि एक विलक्षण जीवन जगेन कारण त्या वेळीं मला वाटायच की Managers ना काहीही करण्याची गरज नाही. फक्त त्यांच्या Subordinates ना Order द्यायच आणि
त्यांचे ते काम करतात. (जी एक 10 वर्षाच्या मुलाची भ्रामक विचारसरणी होता).
Believe it or not friends, but सध्या मी एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये एक Territory Manager म्हणून काम पाहत आहे आणि 250 हून अधिक employees ना Handle करत आहे . ज्या वेळी मला हा job मिळाला , वाटल life set झाली, पण मला तुसभर पण कल्पना नव्हती की है job मला salary बरोबरच बरच काही
देणार आहे.
ज्या वेळी मी actual मधे काम करायला सुरु केल तेव्हा कळाल की इथे पुस्तकी ज्ञानपेक्षा
व्यवहार ज्ञान (ज्याला आपन शुद्ध मराठी
मध्ये Common Sense म्हणतो) आणि व्यवस्थापन
म्हणजेच Management ची जास्त गरज आहे. इथे तर माझ्या पेक्षा जास्त Technical knowledge असणारे लोक आहेत . मग मला कळेना की मला का कंपनी Appoint केल आहे.
त्याच कारन मला पुढचा २-३ दिवसांमधे लक्षात आल की जरी माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकाना Technical knowledge जास्त आहे पण त्यांना Manage करन पण खुप गरजेच आहे आणि त्यासाठीच प्रत्येक Company ला Managers ची गरज असते.
त्याच कारन मला पुढचा २-३ दिवसांमधे लक्षात आल की जरी माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकाना Technical knowledge जास्त आहे पण त्यांना Manage करन पण खुप गरजेच आहे आणि त्यासाठीच प्रत्येक Company ला Managers ची गरज असते.
Managers आणि Management म्हंटल की मला चटकन एका पुस्तकची आठवण झाली. सुदैवाने Job मिळण्याआधी मला मराठी- इंग्रजी लेखक अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले पुस्तक "बोर्ड रूम" वाचण्याची संधी
मिळालेली. अच्युत गोडबोले यांनी संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, मनोविज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानावर बरीच पुस्तके लिहिली
आहेत. आयटी उद्योगात त्यांचा 32 वर्षांचा अनुभव असून त्यांनी L & T इन्फोटेक, सिंटेल, पटना कॉम्प्यूटर
सिस्टम, अपार आणि दिशा या कंपन्यांमध्ये टॉप मॅनेजमेंटची Position हाताळली आहे. त्याच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे या सर्व कंपने त्याच्या
छत्राखाली यशच्या शिखरावर पोहोचले आहेत.
या पुस्तकाला तुम्ही व्यवस्थापनाचा कामधेनु म्हणा अथवा Bible for the Young Managers म्हणा, पण या पुस्तकाने आजच्या मोठ्या उद्योगांच्या अनेक प्रेरणादायी कथा उघड केल्या आहेत . या पुस्तकात 1800 व्या शतकापासून ते २१ व्या शतकातील जगातील सर्वात आधुनिक क्रांतीची सर्व महान कथा अगदी रोचक पद्धतीने सांगितल्या गेल्या आहेत .
एकदा आपण ते वाचू
लागलात, तेव्हा आपल्याला आर्य चाण्यक्यपासून ते amazon.com च्या समस्त संभाव्य Management
skills सापडतील . Ford Mustang कसे अस्तित्वात आले आणि फोर्ड मोटर्सने वाईट दिवस का
पाहिले, जगातील सर्वात वेगाने वाढणार्या फास्ट
फूड चेनची म्हणजेच मॅक्डॉनल्ड्सची मजेदार गोष्ट, जिलेट कंपनीने डिस्पोजेबल ब्लेडची कल्पना कशी लावली, यासारख्या असंख्य मोठ्या मोठ्या कंपन्यांचा इतिहास यामध्ये
आहे. यासह आपल्याला जनरल मोटर्स, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, कोका कोला, इंटेल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, नोकिया यांचा जन्मही मिळेल. पहे पुस्तक म्हणजे फ़क्त white
paper वर black ink नसून यश आणि अपयश, अप आणि डाउन, जपानी व्यवस्थापन कौशल्य यासारख्या अनेक गोष्टींची भेळ आहे.
आता, हे पुस्तक वाचल्यानंतर मला जाणवले की केवळ Technical knowledge असणे आपल्याला Successful बनवू शकत नाही. आपल्याला Management skills माहित असणे आवश्यक आहे. Management न करता, एकही कंपनी टिकणार नाही. Manager हा मूवी मध्ये
दाखवतात तसा नसतोच मुळी. एका मैनेजरच्या
खांदयावर खूप जबाबदार्या असतात . एका Manager कड़े Decision making skill, Leadership, Passion, Commitment
यासारख्या Important skills असणे आवश्यक आहे. Decision making skill गरजेचे आहे कारण Manager च्या एक चुकीच्या डिसीजन मुळे company च लाखो करोड़ोच नुकसान होऊ शकत. Leadership
साथी एक उदाहरण देतो. जर १०० कुत्रांचा कळपाचा Leader जर एक वाघ असेल तर
ते १०० कुत्रेपण वाघा सारखे लढातील पण जर १०० वाघांच्या कळपाचा leader
जर एक कुत्र असेल तर ते वाघ असून पण कुत्रासारखे पळून जातील. म्हणून Leadership quality महत्त्वाची आहे.
PayPal कडून एलोन मस्कला $180 मिलियन मिळाले, त्याने SpaceX मध्ये $100 दशलक्ष, Tesla मध्ये $70 दशलक्ष आणि Solar
City मध्ये $10 दशलक्ष गुंतवले. मग, त्याने पैसे उधार घेउन राहत्या घराचा भाड़े दिल. याला म्हणतात Passion
आणि Commitment जे एक Manager कड़े असायला हवे. जेव्हा परिस्थिती त्याच्या अनुकूल नसल्यास ती
परिस्थिती कशी हाताळायची हे त्याला माहित असले पाहिजे, तो चुकांची जबाबदारी घेणारा असवा, वाईट परिस्थितिस सामोरे जाणारा असावा, कारण तो फक्त Manager नसतो, तो एक leader ही असतो आणि leader
हा bad performance ची जबाबदारी घेऊन त्याच्या team ला विश्वासात घेऊन काम करणारा असावा आणि चांगल्या कामगिरीसाठी आपल्या team
श्रेय देणारा असावा.
या पुस्तकाबद्दल
सांगण्यासारखे बरेच काही आहे परंतु ते म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत
नाही अगदी तसच ह्या पुस्तकाच्या बाबतीत आहे.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा.
अच्युत गोडबोले यांचे "बोर्ड रूम": https://amzn.to/2TSmUOC
मित्रांनो comment करा तुमच मत अणि शेयर करा तुमचा experience.
अच्युत गोडबोले लिखित "बोर्ड रूम"- व्यवस्थापनाचा कामधेनु
Reviewed by Shubham
on
April 06, 2019
Rating:

No comments: