अवकाश संशोधन करणाऱ्या 'इस्र्रो' या भारतीय संस्थेचा विकास कसा झाला ?

सोव्हिएत रशियाने १९५७ साली स्फुटनिक नावाचा एक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून एका नव्या पर्वाची सुरवात केली. या प्रयोगवरून उपग्रहांची उपयुक्तता समजायला भारतीय वैद्यनानिकांना वेळ लागला नाही. डॉ. विक्रम साराभाई हेही याला अपवाद नव्हते. डॉ होमी भाभा यांनी १९६२ साली 'इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च' ची स्थापन करून  तिची सूत्रे डॉ साराभाई यांच्याकडे सोपवली. त्या वर्षीपासून केरळ राज्यातील 'थुम्बा' येथून 'साऊंडिंग' रॉकेट्स च्या प्रयोगाला सुरुवात झाली.
उच्च वातावरणाचा अभ्यास हा त्यामागचा हेतू होता. यासाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया या देशांची मदत घेण्यात आली. अवकाश संशोधनाचा विस्तार वाढत चालल्याचे लक्षात आल्यावर केवळ अवकाश संशोधनासाठी १९६९ साली 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' म्हणजेच 'इस्र्रो' ची स्थापन झाली.


इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनम्हणजेच 'इस्र्रो
 रॉकेट्स चा तंत्रन्यानासाठी भारताला इतर प्रगत देशांवर फार काळ अवलंबून राहणे शक्य नव्हते. म्हणून इस्र्रोने स्याटेलाईट लाँच व्हेइकल (एस. एल. व्ही.) हा प्रकल्प हातात घेतला.घन इंधन असणारे चार टप्प्याचे रॉकेट असे त्याचे स्वरूप होते. त्याबरोबरच उपग्रहाचा हि विकास सुरु झाला. ११ एप्रिल १९७५ रोजी भारताने 'आर्यभट्ट ' हा पहिला उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला.त्यानंतर 'भास्कर-' या उपग्रहाचे १९७९ साली यशस्वी प्रक्षेपण झाले. मध्यंतरी आंध्र प्रदेश येधील श्रीहरीकोटा येथे एक नवीन उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले. १९८० साली तेथूनच एस एल व्ही- रॉकेट ने रोहिणी उपग्रह बरोबर घेऊन अवकाशात झेप घेतली.


ध्रुवीय कक्षेत (पोलर ऑर्बिट) भ्रमण करणारे उपग्रह जास्त उपयुक्त ठरतील असं लक्षात आल्यावर पोलर स्याटेलाईट लाँच व्हेइकल (पी.एस.सल.व्ही.) वर काम सुरु झाले. पण त्यासाठी द्रवरूप इंधन लागणार हे लक्षात आल्यावर भारताने फ्रान्सची मदत घेतली. १९९४ साली भारताच्या पोलर स्याटेलाईट लाँच व्हेइकलने अवकाशात यशस्वी उड्डाण केले. 'रिमोट सेंसिइंग' आणि 'कम्युनिकेशन' उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी याच रॉकेटने बहुमोल कामगिरी बजावली.
इस्र्रोचे रॉकेट्स

आता 'भूस्थिर उपग्रह' (जिओस्टेशनरी स्याटेलाईट) प्रक्षेपित करण्याचा बाजूने प्रयत्न चालू झाले. जिओस्टेशनरी स्याटेलाईट लाँच व्हेइकल (जि.एस.सल.व्ही.) या प्रचंड रॉकेटच्या शेवटचा टप्यासाठी क्रायोजेनिक इंजिन ची गरज असते. त्यासाठी इस्र्रोने रशियाच्या 'ग्लाव्ह कॉसमॉस' या संस्थेची मदत घेतली आणि त्या संस्थेने भारताला क्रायोजेनिक इंजिन्स पुरवली, पण अमेरिकेने निर्बंध घातल्यामुळे 'ग्लाव्ह कॉसमॉस' कडून इंजिन्स येणे बंद झाले. आता भारताला स्वतःच क्रायोजेनिक इंजिन्स विकसित करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि ते तयार होण्यासाठी भारताला २००६ साला पर्यंत वाट बघावी लागली. २००८ साली भारताचे चांद्रयान याच रॉकेट आणि याच इंजिन द्वारे चंद्राचा दिशेने प्रक्षेपित झाले

जिओस्टेशनरी स्याटेलाईट लाँच व्हेइकल (जि.एस.सल.व्ही.)

भारताची इसरो हि अवकाश-संशोधन संस्था आज नाव रुपाला आलीआहे. जर्मनी, इंडोनेशिया वगैरे देशांचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्याची कामगिरी इसरो ने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. इसरो ने विकसित केलेल्या रॉकेट्सच्या आधारेच भारतीय सैन्याचे क्षेपणास्त्रे सिद्ध झाली आहेत.

इस्र्रो बद्दलच्या अशाच आणखीन रोचक माहिती साठी वाचा बखार इस्र्रोच्या अग्निबाणाची, लेखक गोपाल राज आणि अनुवाद अभय सदावर्ते.

तसेच अवकाशाबद्दलची कुतूहलाची भूक शमवण्याकरिता वाचा मला उत्तर हवाय- अवकाश, लेखक मोहन आपटे.
-
अवकाश संशोधन करणाऱ्या 'इस्र्रो' या भारतीय संस्थेचा विकास कसा झाला ? अवकाश संशोधन करणाऱ्या 'इस्र्रो' या भारतीय संस्थेचा विकास कसा झाला ? Reviewed by Shubham on March 31, 2019 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.